|
निगडीत वृत्त : रामसेतू प्रकरण
|
निगडीत वृत्त : रामसेतू प्रकरण
|
निगडीत वृत्त : देशाचे वाटोळे करणार्या सर्वच राजकीय पक्षांना नष्ट करा !
|
जम्मू, २७ जुलै (संकेतस्थळावरून) – काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवणार्या नेदरलँडमधील एक बिगरसरकारी संस्था, कोलकाता येथील एक महिला प्राध्यापक व अहमदाबादस्थित एक वकील यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे एक पत्र गुप्तचर संस्थेने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला लिहिले आहे.
(अशा भारतद्वेष्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्याऐवजी धिम्या गतीने काम करणारी गुप्तचर संस्था ! – संपादक) या देशद्रोही भारतियांनी एकत्र येऊन युरोपमध्ये भारताच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे. तसेच काश्मीरमधील दहशतवादी संघटनांना पैसा पुरवण्यासाठी ते युरोपमध्ये निधी उभारत असून आतापर्यंत कोट्यवधी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
अमेरिकेत कार्यरत असलेल्या काश्मीरमधील काही विघटनवादी व नेदरलँड येथील बिगर सरकारी संघटना काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा प्रचार युरोपमध्ये करत आहेत. (काश्मीरमधील दहशतवादी दररोज बाँबस्फोट व हिंसाचार यांद्वारे जनतेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करत असतांना त्याविषयी मूग गिळून बसणारे वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! – संपादक) गुलाम नबी फाई हा देशद्रोही सध्या अमेरिकेत कार्यरत असून तो स्वत:ची संपूर्ण शक्ती भारतविरोधी प्रचार करणे व दहशतवाद्यांसाठी पैसा उभारणे यांसाठी वापरत आहे. तसेच युरोपमधील पाकिस्तानच्या वकिलाती भारताच्या विरोधात कारवाया करण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. (याबाबत पाकिस्तान सरकारला केंद्र सरकार जाब विचारणार का ? – संपादक)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोलकाता येथील आयएस्आयची हस्तक असलेली महिला प्राध्यापक व अहमदाबाद येथील वकील यांचे पारपत्र रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारत या प्रकरणी नेदरलँडच्या उच्चायुक्तांकडे संपर्क साधण्याचीही शक्यता आहे.
| मित्रांना पाठवा | 39 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत
|
अहमदाबाद, २७ जुलै (वृत्तसंस्था / प्रे.ट्र.) – सुरत येथे पोलिसांना स्फोटकांनी भरलेल्या दोन चारचाकी गाड्या सापडल्या. आज शहरातील पूनागम रुग्णालयाच्या नजीक डिटोनेटर्सने भरलेली काळया रंगाची वॅगनआर् गाडी सापडली, तर वरच्छा परिसरामध्ये स्फोटकांनी भरलेली लाल रंगाची मारुती सापडली. या दोन्ही गाड्यांवरील क्रमांकाच्या पट्ट्या बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले. (सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी काश्मीरमधील दहशतवाद वेळीच निपटला असता, तर आज सर्वत्र दहशतवाद फोफावला नसता ! – संपादक)
“काल रात्रीपासून पूनागम रुग्णालयाच्या नजीक चारचाकी गाडी उभी होती”, अशी माहिती स्थानिकांनी दिली. “बाँब तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य या गाडीमध्ये उपलब्ध आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज अहमदाबाद व सुरत या शहरांमध्ये सापडलेले जिवंत बाँब निकामी करण्यात आले. या घटनेमुळे गुजरातमधील जनता अजूनही भीतीच्या सावटाखाली वावरत आहे.
काल अहमदाबादमध्ये झालेल्या १६ बाँबस्फोटांमधील मृतांची संख्या ४५ वर गेली असून बाँबस्फोटांमध्ये १६२ जण जखमी झाले आहेत. (निष्पाप नागरिकांचे बळी घेणार्या दहशतवादाचे दुष्टच्रक थांबवू न शकणारे नाकर्ते राज्यकर्ते वैचारिक क्रांती अपरिहार्य करतात ! – संपादक) आज अहमदाबादमध्ये लष्कराने ध्वजसंचलन केले.
संशयिताचे रेखाचित्र तयार
आज अहमदाबादमधील पोलिसांनी एका संशयिताचे रेखाचित्र तयार केले. एका प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून हे रेखाचित्र काढण्यात आले आहे. संबंधित प्रत्यक्षदर्शी संध्याकाळी चार वाजता तेथील सरकारी रुग्णालयामध्ये गेला होता. त्या वेळी सदर संशयिताचे भ्रमणध्वनीवरील संभाषण त्याने ऐकले. “बंगळुरूमधील चुका येथे होणार नाहीत. आम्ही येथे चुकणार नाही”, असे संशयित भ्रमणध्वनीवरून सांगत होता. प्रत्यक्षदर्शी म्हणाला,“मी या संभाषणाकडे गांभीर्याने घेतले नाही; मात्र बंगळुरू व अहमदाबाद येथील बाँबस्फोटांच्या नंतर मला सदर व्यक्तीचा संशय आल्याने मी पोलिसांना माहिती दिली.”
लालकृष्ण अडवाणी यांची जखमींना भेट
आज भाजपचे वरिष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी जखमींची सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत होते.
| मित्रांना पाठवा | 67 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत
|
२४ जुलै रोजी ताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत काही शिवसैनिकांनी ताजमहाल गाठले व तेथे पूजा केली. या घटनेमुळे ताजमहाल खरोखर पूर्वीचे हिंदूंचे मंदिर होते का, या चर्चेला उधाण आले. प्रसिद्ध इतिहाससंशोधक कै. प्रा. पु.ना. ओक यांच्या `ताजमहाल : द ट्रू स्टोरी’ या पुस्तकातील अनेक पुरावे ताजमहाल शिवमंदिरच असल्याची साक्ष देतात.
लेखक : डॉ. वासुदेव शं. गोडबोले, इंग्लंड
शहाजहानने ताजमहाल बांधला नाही, तर राजा जयसिंगाकडून बळकावला प्रा. पु.ना. ओक त्यांच्या `ताजमहाल : द ट्रू स्टोरी’ या पुस्तकात लिहितात, “ ताजमहाल हे बेगम मुमताज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेले थडगे नव्हे, तर ते शिवाचे एक प्राचीन मंदिर होते. (`तेजोमहालय’ या नावाने त्या वेळी त्याला ओळखायचे.) शहाजहान यांनी हे शिवमंदिर त्या वेळचे जयपूरचे महाराजा जयसिंग यांच्याकडून बळकावले. शहाजहान यांनी स्वत:च्याच दरबारातील बखर असलेल्या `बादशहानामा’मध्ये, मुमताजचे थडगे बनवण्यासाठी आग्रा येथील सुंदर ताजमहाल राजा जयसिंग यांच्याकडून बळकावल्याचे मान्य केले आहे.
मुमताज महालमुळेच `ताजमहाल’ हा शब्द प्रचलित, असे म्हणणे आधारहीन ! जयपूरच्या महाराजांच्या पूर्वीच्या गोपनीय कागदपत्रांमध्ये शहाजहान यांचे ताजमहाल त्यांना सुपुर्द करण्याचे आदेश उपलब्ध आहेत. त्या काळी अशा प्रकारे बळाकावलेल्या इमारतींचा वापर राजदरबारातील मृतांच्या थडग्यांसाठी करण्याची पद्धत मुसलमान राज्यकर्त्यांमध्ये प्रचलित होती. हुमायून, अकबर, एतमूद-उद-दौला, सफ्दरजंग यांची थडगीही महालांमध्ये उभारण्यात आली आहेत. इमारतींसाठी `महाल’ हा शब्द मुसलमान राष्ट्रांमध्ये कधीच वापरला जात नव्हता. त्यामुळे मुमताज महालमुळेच `ताजमहाल’ हा शब्द प्रचलित झाल्याच्या विधानाला तर्कशास्त्रानुसार कोणताच आधार प्राप्त होत नाही.
ताजमहालचा दरवाजा शहाजहानच्या कालखंडाच्या ३०० वर्षे पूर्वीचा – मर्वीन मिलर यांची स्पष्टोक्ती !
मुमताज व शहाजहान यांची प्रेमकहाणी ही दरबारातील खुशामतींनी घडवलेली एक दंतकथा आहे; कारण या प्रेमकहाणीचा कोणताही पुरावा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध नाही, असा दावा प्रा. ओक यांनी केला होता. शहाजहान यांच्या खूप पूर्वीपासून ताजमहाल अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे प्रा. ओक यांनी सादर केले होते. ते पूर्वीचे शिवमंदिर होते व आग्रा शहरातील रजपूत तेथे पूजा करायचे. उदा. न्यूयॉर्कमधील प्रा. मर्वीन मिलर यांनी कार्बन डेटींगचा आधार घेऊन ताजमहालच्या नदीच्या बाजूच्या दरवाज्याची चाचणी केली होती. त्यामध्ये त्यांनी तो दरवाजा शहाजहानच्या कालखंडाच्या ३०० वर्षे पूर्वीचा असल्याचे सिद्ध केले होते. मुमताजच्या निधनानंतर एक वर्षांच्या आत आग्रा येथे भेट दिलेल्या पीटर मुंडी, या ब्रिटीश व्यक्तीनेही ताजमहाल शहाजहानच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी अस्तित्वात होता, असे लिहून ठेवले आहे.
ताजमहालाचे सत्य लपवण्यासाठी इंदिरा गांधी यांची प्रा. ओक यांच्या पुस्तकावर बंदी
ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रा. ओक यांनी तेथील नमुने, वास्तूशिल्पकला यांचा आधार घेतला होता. ताजमहालाच्या अनेक खोल्या शहाजहानच्या काळापासून बंदच होत्या व आताही त्या खोल्यांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तेथे शिर छाटलेली शिवाची मूर्ती व हिंदूंच्या मंदिरांत वापरल्या जाणार्या इतर वस्तू आहेत. हे सत्य जगासमोर आल्यास राजकीय आकांडतांडव माजेल, या भीतीपोटी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रा. ओक यांच्या पुस्तकावर बंदी घातली होती.
विद्यमान सरकारने ताजमहालातील या खोल्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या समक्ष खुल्या कराव्यात व त्यांनाच त्यांची चौकशी करू द्यावी, ही अपेक्षा !
`ताजमहाल बांधण्यासाठी २० हजार माणसे २२ वर्षे सतत काम करत होती’, हे फ्रेंच व्यापारी टॅव्हर्नियरचे विधान म्हणजे शुद्ध भूलथाप आहे. हे आकडे आले कोठून ? – डॉ. वासुदेव गोडबोले
(संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-03-30&action=fullnews&catid=9&id=6584)
| मित्रांना पाठवा | 12 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : इतिहासद्रोही राज्यकर्ते
लोकसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेच्या दरम्यान भाषण करतांना श्री. राहुल गांधी यांनी आपण `इंडियन’ आहोत, असे म्हटले आणि त्यानंतर ओमर फारुख अब्दुल्ला यांनी त्यांच्या भाषणात `आपण आधी मुसलमान आहोत, मग भारतीय आहोत’, असे सांगितले. जवाहरलाल नेहरूंचे पणतू श्री. राहुल गांधी हिंदूंना `इंडियन’ होण्याचे आवाहन करत आहे. त्यांच्या तोंडावर लोकसभेत ओमर अब्दुल्लांनी आम्ही मुसलमानच रहाणार आहोत, असे गर्जून सांगितले; पण मुसलमानांनी `इंडियन’ व्हायला पाहिजे, असे श्री. राहुल गांधी एकदाही म्हणत नाहीत !
श्री. राहुल गांधींना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून लोकांसमोर उभे करण्याचा खटाटोप काँगे्रेस करत आहे. हे भावी पंतप्रधान त्यांच्या पणजोबांपेक्षा वेगळे नाहीत. पणजोबा इंग्लंडच्या आहारी केले होते, तर हे अमेरिकेच्या आहारी गेले आहेत !
राहुल गांधी आणि अणूऊर्जासंधी !
लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला अनेक पैलू आहेत. या लेखात श्री. राहुल गांधी आणि उमर फारुख अब्दुल्ला या दोघांच्या भाषणांचा विचार करणार आहोत. दोघेही तरुण आहेत आणि भविष्याविषयी तरुणांच्या मनात जे विचार असतात, ते या दोघांच्या भाषणातून व्यवस्थित व्यक्त होतात, असे मानण्याची बौद्धिक शिस्त विचारवंतांनी घालून दिली आहे. आपण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर `इंडियन’ म्हणून बोलायला उभे राहिलो आहोत, अशी सुरुवात श्री. राहुल गांधी यांनी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अलीकडील विदर्भ दौर्याची कथा सांगितली. कर्ज फेडता येणे अशक्य असलेल्या आणि म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या झोपडीस त्यांनी भेट दिली. काबाडकष्ट करून शेतकर्याची पत्नी आपला मोठा परिवार जगवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले. `मुले अभ्यास कधी करतात ?, कसा करतात ?’, हे विचारल्यावर त्या बाईने रॉकेलवर जळणारा भगभगीत दिवा म्हणजे टेंभा समोर आणून ठेवला आणि त्या प्रकाशात रात्री, सर्व पोटापाण्याची कामे उरकून झाल्यावर मुले अभ्यास करतात, असे सांगितले. ही कथा सांगून झाल्यावर श्री. गांधी यांनी पददलितांचे संसार सुखी होण्यासाठी विजेची आवश्यकता असून ती पूर्ती अणूऊर्जासंधीने होणार आहे, असे सांगितले. अशी दृष्टी अटलबिहारी वाजपेयींना होती, असेही जाता जाता त्यांनी सांगितले.
राहुल गांधीच्या `इंडियन’ भूमिकेला ओमर अब्दुल्लाचे आव्हान !
ओमर अब्दुल्लांनी आपण भारतीय असलो, तरी मुसलमान आहोत, हे आग्रहाने सांगितले. त्यानंतर लगेच त्यांनी हेही सांगून टाकले की, पूर्वी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून काम करून त्यांनी मोठी चूक केली असून भाजपसमवेत मैत्री करण्याची चूक ते पुन्हा करणार नाहीत. त्याचे कारण देतांना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजप प्रत्येक प्रश्नाकडे जातीय दृष्टीने पहातो. अमरनाथ यात्रा सुरळीत चालू होती, त्यात यांनी हिंदु-मुस्लिम असा भेद आणला. काश्मीरची भूमी आमची आहे. त्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे. जीवनमरणाचा लढा चालू आहे. आमची भूमी आम्ही कोणालाही देणार नाही, हे भाजपवाले समजून घेत नाहीत. श्री. राहुल गांधींच्या भूमिकेला ओमर अब्दुल्लांनी आव्हान दिले आहे. तरी दोघेही बरोबर आहेत, असे मुकाट्याने मानून हिंदूंनी अणूऊर्जासंधीला मान्यता द्यावी, असा त्या दोघांचा आग्रह आहे; म्हणून या दोघांच्या भाषणांची चिकित्सा केली पाहिजे. भारतात दोनच जाती आहेत, असे स्वामी चिन्मयानंद म्हणत. एक म्हणजे आज जे हिंदु आहेत ते आणि दुसरे म्हणजे कालपर्यंत जे हिंदु होते ते. तत्त्वत: स्वामी चिन्मयानंदांची वर्गवारी योग्य आहे; परंतु व्यवहारत: बोलायचे झाले, तर या दोन जातींत तिसरी जात येऊन बसली आहे आणि ती सगळयांत मोठी आहे. ही जात स्वत:ला `इंडियन’ म्हणवून घेते. कांँग्रेसच्या पहिल्याच अधिवेशनात म्हणजे १८८५ मध्ये मुसलमानांची मने जिंकण्यासाठी ज्यांनी `हिंदुत्वाचा’ त्याग केला आणि `हिंदीत्वाचा’ स्वीकार केला, त्या काँग्रेसजनांचे वंशज आज स्वत:ला `इंडियन’ म्हणवून घेतात!
काँग्रेस पक्ष स्थापनेच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ होता !
परंतु त्या वेळच्या आणि आजच्या काँग्रेसजनांमध्ये खूप मोठा फरक आहे. हिंदी राष्ट्रवादाची निर्मिती हा त्या वेळच्या काँग्रेसजनांच्या दृष्टीने एक प्रयोग होता. त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन सुरू केले नव्हते. तसेच हिंदु परंपरांचा अभिमान बाळगण्यात चूक होत असल्याचे त्यांना वाटत नव्हते. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी `आजपासून मी हिंदु राहिलो नाही’ असे घोषित केले, तरी त्यांनी लिहिलेल्या `राईज ऑफ मराठा पॉवर’ (न.र.फाटकांनी केलेले मराठी भाषांतर : मराठी सत्तेचा उत्कर्ष) या पुस्तकावरून श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे मर्म त्यांना कळले होते आणि जरी व्यवहारात हे हिंदी राज्य होणार असले, तरी तत्त्वत: हे हिंदु राष्ट्रच, अशी त्यांची भूमिका होती. पुढे ३० वर्षांनी लो. टिळकांनी लखनौशी संधी करून त्या वेळच्या राजकारणात ब्रिटिशांकडून मिळणार्या सवलतीत मुसलमानांना थोडा अधिक वाटा दिला. तरी मुसलमानांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी श्री गणेशोत्सव आणि हिंदूंना स्वराज्याचा अर्थ नेमका कळण्यासाठी श्री शिवजयंत्युत्सव त्यांनी सुरू केला. त्यावरून ते हिंदुत्वाचे अभिमानी होते, हे सिद्ध होते. राजकारणाची सूत्रे गांधींच्या हाती गेली आणि राष्ट्रवादाच्या संकल्पनात आरपार बदल झाला. हिंदी राष्ट्र निर्मितीसाठी हिंदुत्वाचा म्हणजे हिंदु परंपरांचा तिरस्कार केला पाहिजे, हे पहिले सूत्र गांधींनी रुजवले. दुसरे सूत्र लांगूलचालनाचे. मुसलमानांनी `इंडियन’ होण्यासाठी त्यांच्या मनातील `हिंदु’विषयाची भीती नाहीशी झाली पाहिजे. मुसलमानांच्या मागण्या उदारपणे मान्य करण्याने ही भीती नाहीशी होईल आणि मुसलमानांना हिंदी राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल अणि एकसंध राष्ट्र नव्याने निर्माण होऊन जगासमोर आदर्श उभा केला जाईल, असे स्वप्न गांधींनी हिंदूंना दिले.
राहुल गांधी मुसलमानांना `इंडियन’ होण्याचा आग्रह का धरत नाहीत ?
तेव्हापासून हिंदी राष्ट्र उभे करण्याच्या एकमेव ध्यासाने हिंदू पछाडलेले दिसतात. मुसलमानांना बरे वाटावे; म्हणून काँग्रेसजन हिंदु परंपरांपासून जेवढे दूर जाता येईल, तेवढे दूर जात आहेत आणि मुसलमान मागतील, ते त्यांना देत आहेत. काँग्रेसने हिंदूंना स्वतंत्र करण्याआधी मुसलमानांना स्वतंत्र केले आणि त्यांना सिंहासनात चिणून बसवण्यासाठी पाकिस्तान नवे राष्ट्र निर्माण करून दिले. म्हणजे हिंदी राष्ट्र बनवण्याच्या ढोंगाखाली काँग्रेसने पाकिस्तान बनवले. गांधींनी हिंदी राष्ट्राचे स्वप्न दिले; पण वास्तवात त्यांनी नव्या इस्लामी राष्ट्राची स्थापना केली. साठ वर्षांनंतर काँग्रेसने असा पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या रूपाने उभा केला की, जो राष्ट्रीय संपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे, असे म्हणेल. याच मनमोहनसिंग यांच्या सरकारने सच्चर समिती नेमून मुसलमानांना हवे ते वैधपणे देण्याची सोय केली. काँग्रेस सहजपणे मुसलमानांच्या दबावाला बळी पडते. काँग्रेस तेवढ्याच सहजपणे अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार आहे. अमेरिका जेथे मिळेल, तेथे मुसलमानांना ठोकून काढण्यासाठी उत्सुक आहे; पण आशियात मात्र हिंदूंना ठोकून काढण्यासाठी ती मुसलमानांचा पक्ष उचलून धरणार आहे. अशा अमेरिकेशी भारत सरकार अणूऊर्जासंधी करणार असून त्याचे समर्थन करतांना जवाहरलाल नेहरूंचे पणतू श्री. राहुल गांधी हिंदूंना `इंडियन’ होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या तोंडावर लोकसभेत ओमर अब्दुल्लांनी `आम्ही मुसलमानच रहाणार आहोत’, असे गर्जून सांगितले; पण मुसलमानांनी `इंडियन’ व्हायला पाहिजे, असे श्री. राहुल गांधी एकदाही म्हणत नाहीत. हिंदूंना आम्ही भूमी देणार नाही, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले, तेव्हा त्यांच्या या विधानाचा निषेध एकाही काँग्रेसजनाने केला नाही.
श्री. राहुल गांधींना भारताचे भावी पंतप्रधान म्हणून लोकांसमोर उभे करण्याचा खटाटोप काँगे्रेस करत आहे. हे भावी पंतप्रधान पणजोबांपेक्षा वेगळे नाहीत. ते इंग्लंडच्या आहारी केले होते; हे अमेरिकेच्या आहारी गेले आहेत.
देशाची सुरक्षा व सार्वभौमत्व गहाण ठेवायला लावणारा अणूऊर्जासंधी नकोच !
अणूऊर्जासंधीने वीज मिळेल, या प्रकाशात विदर्भातील दारिद्र्य पीडित मुलांना अभ्यास करून आयुष्य घडविता येईल, हे सांगायला श्री. राहुल यांची आवश्यकता नाही. अणूपासून वीजोत्पादनास कोणाचा विरोध नाही. त्यासाठी भारताची सुरक्षितता आणि सार्वभौमता गहाण टाकण्यास देशभक्तांचा विरोध आहे; कारण जी नवी वीज मिळेल, तिच्या प्रकाशात अभ्यास कोणता करायचा ते ठरवण्याचे स्वातंत्र्य हिंदूंना असणार नाही. त्यांना इस्लामचा अभ्यास करता येईल. ख्रिस्ती तत्त्वांचा अभ्यास करता येईल; पण हिंदु संस्कृतीचा अभ्यास प्रतिगामित्वाचा उपक्रम म्हणून त्याज्य समजण्यात येईल; म्हणून अणूकरार अत्यंत सावधपणे स्वीकारावा लागणार आहे. हिंदुहितरक्षण या एकमेव कसोटीवर प्रत्येक गोष्टीचा स्वीकार वा धिक्कार करावा लागणार आहे.
| मित्रांना पाठवा | 17 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : लेखक : श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार
|
|
निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत
|
मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नादाला लागून सरकार आणू पहात असलेल्या (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी व हा कायदा व्हावा, यासाठी अंनिसतर्फे करण्यात येणार्या `थोबाडीत मारा’ आंदोलनाला चोख उत्तर देण्यासाठी आज आझाद मैदान येथे ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ज्ञानेश्वरी-हरिपाठ प्रसारक प्रतिष्ठान व वारकरी संप्रदाय यांच्यातर्फे समस्त हिंदूंनी संत-महंतांच्या उपस्थितीत `टाळ वाजवा’ प्रखर आंदोलन केले. या आंदोलनात विविध आध्यात्मिक संस्था, संघटना व धर्माभिमानी हिंदू मिळून ८० जण उपस्थित होते.
या वेळी समस्त वारकरी व हिंदू यांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांना प्रस्तावित कायदा रद्द करण्यासाठी संत, महंत व धर्माभिमानी हिंदू यांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन शिष्टमंडळाने विधिमंडळात सादर केले. या शिष्टमंडळात ह.भ.प. विजय महाराज, ह.भ.प. पद्माकर महाराज, ह.भ.प. धाऊबुवा पाटील महाराज, हिंदु धर्माभिमानी श्री. शिवाजी वटकर यांचा समावेश होता.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला सातासमुद्राच्या पलीकडे फेकून द्या – प.पू. किसन महाराज
हिंदुस्थानात हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा व श्रद्धा यांच्या आड येणार्या (अंध)श्रद्धा निर्मूलन कायद्याला समस्त हिंदु धर्माभिमान्यांनी सातासमुद्राच्या पलीकडे फेकून द्यावे. झोपेचे सोंग घेणार्या शासनाला `टाळ वाजवा’ आंदोलनाने जागे करावे व डॉ. दाभोलकरांच्या श्रद्धा-अंधश्रद्धांचा पर्दाफाश करावा, असे आवाहन प.पू. किसन महाराज यांनी केले.
सध्याचे सक्षम कायदे अस्तित्वात असतांना नवा कायदा कशाला ? – ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज
भारतीय दंडविधान संहितेनुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्षम कायदे अस्तित्वात आहेत. यानुसार महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांत अंधश्रद्धेचे १७ गुन्हे दाखल झाले असून त्यांपैकी १३ गुन्ह्यांवर कारवाई झाली आहे व ४ गुन्ह्यांवर सुरू आहे. अंनिस अंधश्रद्धेचा मोठा बाऊ करत असून महाराष्ट्रात खूप भयावह स्थिती असल्याचे चित्र लोकांसमोर निर्माण करत आहे; म्हणूनच अंनिसचा हा नवा कायदा कशाला, असे विचार ज्ञानेश्वरी-हरिपाठ प्रसारक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी या वेळी `झी चोवीस तास’ व `सी टी.व्ही.’ या वृत्तवाहिन्यांशी बोलतांना मांडले.
अंनिसच्या या कायद्यानुसार आम्ही धार्मिक विधी करू शकणार नाही. जोपर्यंत हा कायदा होण्यासाठी अंनिसचा आग्रह असेल, तोपर्यंत हा कायदा न होण्याचा वारकरी संप्रदायाचा आग्रह असेल. हिंदु धर्म टिकवण्यासाठी अंनिसचा कायदा रद्द होणे आवश्यक आहे. हा कायदा हिंदु धर्मावरील मोठे धर्मसंकट आहे. या कायद्याच्या विरोधात आपण एकत्र यायला पाहिजे, अशा उद्बोधक विचारांद्वारे अनेक मान्यवरांनी त्यांची या कायद्याच्या संदर्भातील मते या वेळी मांडली.
क्षणचित्रे
* या आंदोलनात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा व सोलापूर येथील वारकरी व धर्माभिमानी हिंदु सहभागी झाले होते.
* आंदोलनाच्या ठिकाणी असणार्या एका पोलिसाने टाळ वाजवून आंदोलनाला साथ दिली.
* `पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम । पंढरीनाथ महाराज की जय’ व `बजरंगबली की जय’ हे जयघोष करण्यात आले.
* या वेळी वारकरी भजने व `जय जय रामकृष्ण हरि’ असा हरिनामाचा गजर करत होते.
* आंदोलन सुरू असतांना शेकापच्या तेथील आंदोलनकर्त्यांनी मोठ्या आवाजात पोवाडा म्हटला.
* `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणू पहाणार्या शासनाचा निषेध असो’, `अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’चा निषेध करण्यासाठी संघटीत व्हा’, `निषेध असो निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो’, अशा घोषणा या वेळी आंदोलकांनी दिल्या.
* काल अंनिसच्या आंदोलनाच्या वेळी डॉ. दाभोलकरांना स्वत:हून भेट देणार्या उपमुख्यमंत्र्यांनी आज वारकर्यांच्या शिष्टमंडळाला ४ तास ताटकळत ठेवले. (वारकर्यांनो, ही आहे उपमुख्यमंत्र्यांच्या लेखी तुमची किंमत ! – संपादक)
| मित्रांना पाठवा | 18 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : धर्मद्रोही अंधश्रध्दा निर्मूलन कायदा
बंगळुरू, २५ जुलै (प्रे.ट्र. / वृत्तसंस्था) – माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ख्याती असणार्या बंगळुरू शहरात आज एकामागून एक ९ बाँबस्फोट झाले आणि देश हादरला.
(नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे `दहशतवाद्यांकडून बाँबस्फोट होणारा पहिल्या क्रमांकाचा देश’, अशी नवी ओळख झालेल्या भारतात आणखी वेगळे काय घडणार ? – संपादक) या बाँबस्फोटांनी दोन वर्षांपूर्वी भारतीय विज्ञान केंद्रावर झालेल्या बाँबस्फोटाची आठवण करून दिली.
आज दुपारी १.३० ते १.४५ या कालावधीत ७ ठिकाणी बाँबस्फोट झाले. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता म्हैसूर रोडवर असलेल्या गोपालन मॉलमध्ये आठवा बाँबस्फोट झाला. या साखळी बाँबस्फोटांत २ जण ठार झाले असून १२ जण जखमी झाले आहेत. हे बाँबस्फोट कमी शक्तीशाली होते. (जनतेचा जीव घेणारे बाँबस्फोट म्हणे सौम्य प्रकारचे ! – संपादक) शहरात घातपात घडवून आणण्यापेक्षा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा बाँबस्फोट घडवून आणण्यामागे हेतू होता. “मदीवाला येथे झालेल्या बाँबस्फोटात १ महिला ठार झाली”, अशी माहिती पोलीस आयुक्त श्री. शंकर बिद्री यांनी दिली. रुग्णांना सेंट जॉन व मल्ल्या रुग्णालयांत हालवण्यात आले आहे.
बाँबस्फोट झालेली ठिकाणे
हे बाँबस्फोट अदूगोडी, मदीवाला, नयनदहल्ली, म्हैसूर रोड, रिचमंड सर्कल, पंथरपल्ल्या व विठ्ठल मल्ल्या रोडच्या परिसरात झाले. ही सर्व ठिकाणे शहरातील दक्षिण भागात आहेत. “पहिले चार बाँबस्फोट होसूर रोड व मदीवाला या परिसरात झाले. त्यानंतरचे ३ बाँबस्फोट नयनदहल्ली, विठ्ठल मल्ल्या रोड व रिचमंड सर्कल येथे झाले”, अशी माहिती शहराचे आयुक्त श्री. शंकर बिद्री यांनी पोलिसांना दिली. मदीवाला परिसर हा शहरातील सर्वांत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. मदीवालातील बसस्थानकात हा स्फोट झाला. त्यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता गोपालन मॉल व उत्तर बंगळुरूमध्ये दोन बाँबस्फोट झाले.
बाँबस्फोटांनंतर शहरात दहशतीचे वातावरण !
बाँबस्फोटांनंतर शहरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. (बाँबस्फोट रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न काढता बाँबस्फोटांनंतर प्रतिबंधात्मक सुरक्षाव्यवस्था वाढवणारे सरकार म्हणे दहशतवाद निपटणार ! – संपादक) स्फोटांनंतर दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली असून `नागरिकांनी घाबरून जाऊ नये’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बाँबस्फोट झाल्यानंतर लोकांची
घरी जाण्यासाठी झुंबड उडाली. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी झाली. “शहरात आणखी १२ ठिकाणी जिवंत बाँब पेरल्याची शक्यता आहे. पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बाँब मिळाल्यानंतर ते निकामी करण्यात येतील”, असे कर्नाटकचे पोलीस महासंचालक श्री. श्रीकुमार म्हणाले.
बाँबस्फोटांमधील साहित्य शोधण्यासाठी तपास सुरू
हे बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी `टायमर’ लावलेल्या क्रूड बाँबचा वापर करण्यात आला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या बाँबस्फोटांची तीव्रता १-२ ग्रेनेड स्फोटांएवढी होती. हे स्फोट घडवून आणण्यासाठी जिलेटीन स्टीक्स वापरल्याचा तसेच अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. गुन्हे वैद्यकशास्त्राचे पथक व बाँबनिकामी करणारे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
बाँबस्फोटांच्या पार्श्वभूमीवर देशात अतीदक्षतेचे आदेश
बंगळुरूमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, छत्तीसगड, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी दक्षतेचे आदेश देण्यात आले. “मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर इत्यादी शहरांतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे”, अशी माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. अनामी रॉय यांनी दिली.
सिमीचा हात असण्याची शक्यता
या बाँबस्फोटांची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही; मात्र बंदी घालण्यात आलेल्या `सिमी’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता केंद्रीय गृह खात्यातील सूत्रांनी वर्तवली. या स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले साहित्य पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने पुरवले असल्याची शक्यता आहे. (पाकिस्तान भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतला आहे, याचे आणखी किती पुरावे सापडल्यावर भारत सरकार त्याच्या विरोधात पावले उचलणार ! – संपादक)
ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत
बाँबस्फोटांमध्ये ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे”, अशी माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिली. सर्वांनी धार्मिक एकोपा पाळावा, असे सांगत श्री. सिंग यांनी या बाँबस्फोटांचा निषेध केला आहे. (दहशतवादाचा धार्मिक एकोप्याशी काय संबंध ? – संपादक)
कर्नाटकातील हालचालींवर केंद्रीय गृह मंत्रालयाची नजर
बंगळुरूमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्रालय नजर ठेवून आले, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव श्री. मधुकर गुप्ता यांनी दिली. केंद्रातील गृह खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी कर्नाटकमधील सरकारी अधिकार्यांच्या संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांनी या बाँबस्फोटांचा निषेध केला आहे. “परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार कर्नाटक सरकारला सर्वतोपरी मदत करणार”, असे श्री. पाटील म्हणाले.
साल शहर जिवितहानी
१. १३ जानेवारी २००८ जयपूर ६३ ठार
२. २५ ऑगस्ट २००७ हैद्राबाद ४२ ठार
३. १८ मे २००७ मक्का मशीद, हैद्राबाद १३ ठार
४. ८ सप्टेंबर २००६ मालेगाव ३७ ठार
५. ११ जुलै २००६ मुंबई २०० ठार
६. ७ मार्च २००६ वाराणसी २१ ठार
७. २१ ऑक्टोबर २००५ दिल्ली ७० ठार
८. १५ ऑगस्ट २००४ आसाम १६ ठार
९. २५ ऑगस्ट २००३ मुंबई ५२ ठार
१०. १६ फेब्रुवारी १९९८ कोईमतूर ४६ ठार
११. १२ मार्च १९९३ मुंबई २५७ ठार
| मित्रांना पाठवा | 41 – वाचक संख्या | छापील प्रत
निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत
|
|
निगडीत वृत्त : देवतांचे विडंबन करणारे हिंदू धर्माचे वैरी